बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

जँकसनचा काळ :-  हुतात्मा अनंत कान्हेरे

जँकसनचा काळ :-  हुतात्मा अनंत कान्हेरे
         
   तन्मय पाटील

   
आज 21 डिसेंबर 2014 आज जॅक्सन वधाला 105 वर्ष पूर्ण झाली.
     
       अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  ह्यांच्या अभिनवभारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनमध्ये असताना त्यांनी भारतीय तरुणांमध्ये सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटविण्यासाठी जोसेफ म्याझिनी ह्या इटालियन क्रांतिकारकांच्या चरित्रावर एक ग्रंथ लिहला . तो सशस्त्रक्रांतिचे तत्त्वज्ञान विशद करणारा ग्रंथ होता. असा तेजस्वी आणि भयंकर ग्रंथ भारतात बाबारावांनी  प्रकाशीत केला . हा ग्रंथ तसेच स्वातंत्र्य कवी गोविंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकरकरांनी लिहिलेले राष्ट्रभक्ती वरील काव्य आणि पोवाडे प्रकाशीत  केले . असे भयंकर आणि प्रक्षोभक लेखन प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली मुंबईत काळ वृत्तपत्राचे संपादक शिवराम परांजपे ह्यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी जात असताना गणेश(बाबाराव) सावरकरांना ब्रिटीश सरकारने अचानक अटक केली  आणि त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानला पाठवण्यात आले . ह्या शिक्षेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलालधिंग्रा ह्या युवकाने  कर्झन वायली ह्या ब्रिटीश अधिकार्यास गोळ्या घालून ठार केले.तो ब्रिटीश सरकारचा डिटेक्टीव(हेर)होता. लंडनहाउसमध्ये असणार्या हिंदी विद्यार्थ्यांच्या हालचालींवर वायली पाळत ठेवून होता.
मदनलालच्या ह्या शौर्यार्नंतर २१ डिसेंबर १९०९ च्या दिवशी नाशिकला अजून एक असा भयंकर प्रकार घडून आला . . त्याचे नाव होते अनंत कान्हेरे त्याचे वय होते अवघे १८ वर्ष!  कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये  ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील पिस्तुलांपैकी एक  होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे  आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली.  जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे  ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली . आणि नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेले हे शूरवीर  वधस्तंभाकडे चालत गेले  मृतुला कवटाळून घेऊन अमर झाले. अश्या वीर हुतात्म्यांना माझे शतशः प्रणाम !!!!
             
                   स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय !! वंदे मातरम !! अखंड हिंदुस्थान अमर रहे !! 

                                                                                                              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा